प्राणि भूगोल
प्राण्यांचा प्रसार, या प्रसाराचे भौगोलिक संबंध व त्याची कारणमीमांसा हे विषय प्राणिभूगोल या शास्त्राच्या कक्षेत येतात. निरनिराळे प्राणी पृथ्वीवर कोठेकोठे आहेत, ते तेथे कोठून व कसे आले असावेत, भौगोलिक दृष्ट्या त्यांचे आकृतिबंध कसे निर्माण झाले व त्याची काय या सर्व प्रश्नांचा विचार प्राणिभूगोलात केला जातो.